सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, पालिका व पोलिसांचे दुर्लक्ष
“
इचलकरंजी / प्रतिनिधी
राज्यात काल रात्री पासून कडक निर्बंधाची घोषणा केली असताना इचलकरंजी शहरात मात्र खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे शासनाच्या कडक निर्बंधांच्या उपाययोजनेला नागरिकांनी हरताळ फासला असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे सध्या चित्र आहे. येथील वडगांव बाजार समिती व राधा- कृष्ण टॉकीज परिसरात झालेल्या गर्दीकडे पोलीस व पालिकेचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.











