प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील शांतीनगरमध्ये नगरपालिकेच्या कत्तलखान्यालगत असलेल्या पडीक जागेवर अज्ञात तरूणाचा अज्ञाताने अवजड वस्तूने तोंड ठेचून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी दुपारी ११.३० च्या सुमारास उघडकीस आली. मृत तरूणाला दारू पाजून त्याचा खून केल्यानंतर बेल्टच्या सहाय्याने त्याचा मृतदेह ओढत नेवून काटेरी झाडात फेकून दिला आहे. मृताच्या छातीवर ‘आई’ असे गोंदले आहे.
घटनास्थळी गावभागचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक निरीक्षक विकास जाधव आदींनी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी दारूच्या बाटल्या, अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.









