प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजी येथील विद्यमान आमदारांचा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी, बहीण व पुतण्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. इचलकरंजी हे कोरोना समुह संसर्गाचे हॉटस्पॉट बनले आहे. शहरात दररोज सरासरी ५० ते ६० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण मिळत असून ही साखळी खंडित होण्याची चिन्हे दिसत नाहित. शुक्रवारी शहराच्या विद्यमान आमदारांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची प्रथमिक लक्षणे आढळल्यानंतर त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.
शुक्रवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोल्हापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहरात आतापर्यंत नगरसेवक, नगरसविका, मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासह अनेक लोकप्रितनिधी व शासकीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पण आता विद्यमान आमदार कारोनाबाधित झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
Previous Articleसोलापूर : ‘कहा गये 20 लाख करोड’, बार्शीत काँग्रेसचे आंदोलन
Next Article गेहलोत सरकारने जिंकला ‘विश्वासदर्शक ठराव’








