वार्ताहर / उत्रे
महाराष्ट्र राज्य उर्जा विकास अभिकरण यांच्या विशेष फंडातून जिल्हामधून निवडलेल्या तीन शाळामध्ये पन्हाळा तालुक्यातील विद्या मंदिर आळवे व उत्रे या दोन शाळेची विद्युतीकरणासाठी निवड झाली आहे. सदर योजनेतून १०० टक्के निधी उपलब्ध झाला असून महावितरण कडून प्रत्येक वर्ग खोलीसाठी सिलिंग फॅन, टयुबलाईट,एलईडी बल्ब बसविण्यात येण्यात येणार आहेत.
सदर योजनेत शाळेची निवड होण्यासाठी महाउर्जा विभागीय अधिकारी समुद्रगुप्त पाटील, संभाजी शिंदे,आळवे गावचे लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज गायकवाड, कासारी खोरा शिक्षण मंडळाचे सचिव युवराज गायकवाड ,उत्रेच्या सरपंच रंगूताई मगर ,ग्रामपंचायत सदस्य भीमराव पाटील ,पञकार व शिक्षक संजय पाटील,शरद पाटील व सर्व ग्रा.पं. सदस्य व शिक्षण समिती व सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








