प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील कोवीड हॉस्पिटल असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात उपचारात दाखल एका कोवीड रूग्णाचा गुरूवारी सकाळी ९ च्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर त्या मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील जीवनमुक्ती संघटनेचे पदाधिकारी अॅम्ब्युलन्ससह त्वरित रूग्णालयात दाखल झाले. पण रूग्णालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह अतिदक्षता विभागातून रूग्णवाहिकेत ठेवण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध न करण्यास नकार दिला. त्यामुळे कोवीडने मृत व्यक्तीचा गेल्या तीन तासांपासून रूग्णालयातील अतिदक्षता विभागात मृतदेह पडून आहे.
मिरज तालुक्यातील एका गावातील एकास कोरोनाची लागण झाली. त्याला नातेवाईकांनी इचलकरंजीतील कोवीड हॉस्पिटल असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात उपचारात दाखल केले. त्याची प्रकृती नाजूक बनल्याने त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान गुरूवारी सकाळी संबंधित कोवीडबाधीत व्यक्तीचा मृत्यू झाला. याची माहिती मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी शहरातील जीवनमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली. त्यावरून जीवनमुक्तीचे कार्यकर्ते त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अॅम्ब्युलन्स, पीपीई कीटसह तत्काU आयजीएममध्ये दाखल झाले. त्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीचा मृतदेह अतिदक्षता विभागातून अॅम्ब्युलन्समध्ये ठेवण्यासाठी रूग्णालयाच्या अधिकारी व कर्मचार्यांकडे स्ट्रेचरची मागणी केली. तरीही रूग्णालयात अनेक स्ट्रेचर पडून असतानाही मृतदेह उचलण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध करून दिले नाही.
त्यामुळे त्या व्यक्तीचा आयजीएमच्या अतिदक्षता विभागात तीन तासांपासून मृतदेह पडून आहे. या आयजीएमच्या भोगळ कारभाराबद्दल नातेवाईकांतून संताप व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









