प्रतिनिधी / इचलकरंजी
माजी खासदार कल्लाप्पांना आवाडे यांच्या पत्नी व आमदार प्रकाश आवाडे यांच्या मातोश्री सौ. इंदुमती कलाप्पाण्णा आवाडे (88 वर्षे) यांचे आज दुपारी निधन झाले.
इचलकरंजीसह परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माजी खासदार सहकार महर्षी कलाप्पाण्णा आवाडे यांच्या प्रत्येक कार्यात इंदुमती आवाडे यांची मोलाची साथ होती. इंदिरा सहकारी सुतगिरणीच्या त्या संस्थापक चेअरमन होत्या. संपूर्ण आवाडे कुटुंबियांना शेवटपर्यंत त्यांनी मायेच्या धाग्यात बांधून ठेवले. सर्वांच्या *आऊ* असणाऱ्या इंदुमती आवाडे यांच्या निधनाने इचलकरंजीसह परिसरातील सर्व क्षेत्रात शोककळा पसरली आहे.








