सकल मराठा समाजाचा इशारा
आरक्षण लढ्यासाठी गावागावांत बैठकांचा धडाका
लवकरच जिल्हापातळीवरील लढाईस सुरवात
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्या सरकारने तत्काळ मार्गी लावाव्यात. अन्यथा कोल्हापूरचे आंदोलन म्हणजे शासनाला भीमटोला असेल असा इशारा सकल मराठा समाजाने रविवारी दिला. जिल्हÎातील समन्वयकांची मते, सूचना जाणून घेण्यासाठी सध्या गावपातळीवर बैठकांचा धडका सुरु आहे. बैठकांमधील ठराव प्राप्त होत असून आंदोलनाची व्युहरचना सुरु आहे. ठरावामधील सुचनांचा विचार करुन लवकरच आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. त्यानूसार संपूर्ण जिल्हÎात सकल मराठा समाज एकाचवेळी आरक्षणाच्या लढÎासाठी रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समन्वयकांनी दिली.
आरक्षणाला मिळालेली स्थगिती यानंतर राज्यात निघालेली मेगा पोलीस भरती यामुळे मराठा समाजात खदखद सुरु आहेत. सरकाच्या निषेधार्थ राज्यात आंदोलने सुरु आहेत. कोल्हापूरातही आंदोलने सुरु असून पुढील लढÎासाठी व्यूहरचना सुरु आहे. आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, आरक्षणाचा प्रश्न लागेपर्यंत कोणत्याही प्रकारची शासकीय नोकर भरती करु नये, राज्यात निघालेली मेगा पोलीस भरती स्थगित करण्यात यावी, कोपर्डी प्रकरणातील संशयितांना तत्काळ फाशी देण्यात यावी, सारथी संस्थेचे कामकाज नियमितपणे सुरु करावे यासह विविध मागण्यांसाठी समाजाचा लढा सुरु आहे.
आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारातुन आरक्षणाची संकल्पना पुढे आली. संस्थान काळात आर्थिकदृष्टÎा मागस असलेल्या मराठा समाजालाही त्यांनी आरक्षण दिले होते. त्यामुळे आरक्षणासाठी सध्या सुरु असलेल्या लढÎामध्ये कोल्हापूरची भुमिका महत्त्वाची आहे. मराठा समाजातील युवक-युवतींचे नुकसान होईल, असा कोणताही निर्णय सरकारने घेऊ नये, अन्यथा समाजाच्या उद्रेकाला शासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सकल मराठा समाजाकडुन देण्यात आला आहे.
खबरदारी घेत आरक्षण लढ्याचे नियोजन
हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी आणि समाजातील युवक-युवतींना न्याय देण्यासाठी रस्त्यावरील लढाई महात्त्वाची आहे. मात्र सद्दस्थितीत आंदोलनाच्या निमित्ताने मोठयाप्रमाणात एकत्र येणे धोकादायक ठरु शकते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे समाज बांधवांच्या आरोग्याचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी गाव, तालुका, जिल्हापातळीवर आरक्षण लढ्याचे नियोजन सुरु आहे. लवकरच रस्त्यावरील लढाईस प्रारंभ होईल.
– वसंतराव मुळीक, समन्वयक सकल मराठा समाज.
मराठा क्रांतीकडून आज सरकारचं बारावं
आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीला सोमवार 21 रोजी बारा दिवस पूर्ण होत आहे. पोलीस भरती स्थगित करण्याची मागणी करुनही अद्याप याबाबत आदेश काढलेला नाही. याच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारचं प्रतिकात्मक बारावं घालण्यात येणार आहे. तसेच पोलीस भरतीचा आदेश स्थगित करेपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलन स्थगित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने समन्वयकांना नोटीस बजावली आहे. मात्र मराठा समाज बांधवांना न्याय देण्यासाठी पोलीसांचा दबाव झुगारुन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार असल्याचा इशारा समन्वयक दिलीप पाटील, सचिन तोडकर यांनी दिला आहे.









