कोल्हापूर \ ऑनलाईन टीम
कोल्हापूरमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात आजी-माजी मुख्यमंत्री अचानक आमने -सामने आले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस शाहूपुरीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तिथे पोहोचले. यावेळी प्रचंड गर्दी झाल्याचेही दिसून आली. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी यावेळी रस्त्यातच एकमेकांशी काही वेळ चर्चा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मधील पूरग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी जात असतान त्याच ठिकाणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस देखील पहाणी करत असल्याची माहीती मुख्यमंत्र्यांना मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना निरोप दिला की देवेंद्र फडणवीस यांना मी तीथेच भेटतो. त्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निरोप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत भेट करून दिली. या भेटीत फक्त पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.
कोल्हापुरातील शाहुपुरीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची काही मिनिटांसाठीच भेट झाली. या भेटीच्या वेळेस फडणवीसांसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते तर मुख्यमंत्र्यांसोबत शिसेनेचे स्थानिक आमदार, तसंच ग्रामविकास मंत्री मुश्रिफही होते. दोन नेत्यांची जी भेट झाली त्यात नेमकं फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं याची सर्वांना उत्सुकता लागली. नंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी त्याचा खुलासा केला. ते म्हणाले की, जर मुख्यमंत्र्यांनी जर बैठक बोलवली तर आम्ही त्या बैठकीला हजर राहु असं मी त्यांना कळवलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








