कोल्हापूर : प्रतिनिधी
एसटी महांमडळाचे विलिनीकरण करावे या मागणीसाठी गेले अठरा दिवसापासून, संघटना विरहीत कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामध्ये तोडगा काढण्यावर चर्चा सुरू असली तरी. कोणताही विरोध न होता, शुक्रवारपासून कोल्हापूर आगारामधून लालपरी व शिवशाही बसेस् धावू लागल्या आहेत. यामुळे प्रवाशामधून समाधान व्यक्त केले जात आहे. पोलिसांच्या उपस्थितीत शिवशाही सोडण्यात आली.
गेले 18 दिवसापासून कोल्हापूर आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने,एसटी सेवा पूर्णंपणे ठप्प झाली होती. यामुळे विद्यार्थी, नोकरदार, प्रवाशी यांचे हाल सुरू होते. राज्यस्तरावरील तोडगा, कामावर हजर होण्याचा इशारा तसेच कोणतेच नेतृत्व नसल्याने,ना घर का ना घाट का अशी कर्मचाऱ्यांची अवस्था झाल्याने, शुक्रवारपासून कोल्हापूर आगारातील एसटी सेवा सुरू झाली.एमएच 40 8918 ही इचलकरंजी-कोल्हापूर ही पहीली लालपरी सकाळी 10.45 ला कोल्हापूर आगारात दाखल झाली.यातून 15 प्रवाशी कोल्हापूरात आले. इचलकरंजीसाठी याच गाडीतून 10 प्रवाशी रवाना झाले. तर साडे बारा वाजता एमएच 14 जीयु 2078 ही कौल्हापूर-स्वारगेट ही शिवशाही बस पुण्याकडे रवाना झाली.या शिवशाहीचे चालक के.व्ही. लांडगे यांनी केले.
शासनाने संपाबाबत तोडगा काढल्याने तसेच संपाला नेतृत्व नसल्याने संप सुरू टेवायचा की ? कामावर हजर व्हावयाचे या बाबत कर्मचारी संभ्रमावस्थतेत होते. पाच संघटनेच्यां कृती समितीची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे उतम पाटील व वसंत पाटील यांनी सांगितले. गेले 18 दिवसापासून कोल्हापूर आगारामध्ये शुकशुकाट होता. एसटी सेवा बंद असल्याने, प्रवाशांना माहिती देणारा वाहतूक नियंत्रण कक्ष ही बंद होता. पण शुक्रवारपासून हा कक्ष पुन्हा सुरू झाल्याने,कोल्हापूर -स्वारगेट या शिवशाही बसची अनाऊन्समेंट करून पूर्ववत या कक्षाची गर्दी सुरू झाली.









