प्रतिनिधी/सरवडे
आकनूर ता.राधानगरी येथे दिल्लीवरुन आलेल्या एका २५ वर्षीय युवकाचा अहवाल रविवारी कोरोना पाँझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा तरुण अभ्यासानिमित्त दिल्ली येथे गेली२-३ वर्षे वास्तव्यास असतो.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर त्याला आपल्या गावी जाण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली होती. त्यामुळे तो बुधवार दि २० रोजी कोल्हापूर येथील सीपीआर येथे तपासणीसाठी गेला. त्याचा त्यावेळी स्वँब घेण्यात आला. मात्र त्याचा अहवाल रविवारी सायंकाळी पाँझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. परंतु तो युवक आपल्या मुळ गावी आलाच नव्हता. तो गेली ४ दिवस कोल्हापूरातील एका खाजगी हाँटेलमध्ये वास्तव्यास होता. मात्र रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने व ते पालक त्या युवकाच्या संपर्कात आल्याने त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.








