प्रतिनिधी/शाहुवाडी
आंबा घाट ( ता. शाहूवाडी ) परिसरातील पाच डोंगररांगाना लागलेली आग तीन तासाच्या अथक जीवघेणे परिश्रमाने ब्लोअरच्या साह्याने अवघ्या सत्तर लिटर पाण्यात विझवली. वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्थेच्या वसू रक्षकच्या टीमने ही कामगिरी करुन शेकडो एकरातील वनसंपदा व वन्यजीव वाचवले आहेत. शुक्रवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास ही आग लागली.
आंबा घाट परिसरात निसर्गसौंदर्याने वेढलेले हजारो एकर राखीव जंगल पश्चिम घाटातील एक संरक्षित वन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. दुर्मिळ वन औषधी वनस्पती,जंगली वन्यप्राणी यासह विपुल प्रमाणातील दाट जंगल कोकणला जोडणारा आंबा घाट अशा निसर्गसंपन्न आंबा परिसरातील डोंगराना मार्च,एप्रिल महिन्यात आग लावणेचे ( वणवा ) सञ सुरु असते . वन खाते व निसर्ग संवर्धन करणाऱ्या सामाजीक संस्था त्यांचे वन रक्षक या वनव्या पासून जंगलाचे रक्षण करणेसाठी दिवस रात्र मेहनत घेत असतात.
शुक्रवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास याच परिसरातील डोंगरांना लागलेला वणवा वसु सुरक्षा फोर्सचे जवान प्रमोद माळी यांचे मार्गदर्शना खाली अत्याधुनिक ब्लोअरच्या साह्याने तीन तासाच्या प्रयत्नानंतर अवघ्या सत्तर लिटर पाण्यात या पाच डोंगरांना लागलेला वणवा विझवणेत या टीमला यश आले. या फोर्सचे दिग्वीजय गुरव,दिनेश कांबळे, दिपक पाटील, सुनिल काळे, निकील कोलते, दिपक पाटील, सुनिल काळे यांनी जीव धोक्यात घालून वणवा आटोक्यात आणला. त्यांच्या या प्रयत्नामुळे शेकडो एकर जंगल तर विविध प्रकारचे जंगली प्राणी .पशु .पक्षी यांना जीवदान मिळाल्याने निसर्गप्रेमी कडून कौतुक होत आहे. तर, अशा समाजकंटकावर कठोर कारवाईची मागणी निसर्गप्रेमीतून होत आहे .