प्रतिनिधी / कोल्हापूर
जिवबानाना जाधव पार्क येथील अवनी संस्थतील १५ मुली आणि २ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले. सोमवारी महापालिकेच्यावतीने अँटीजेन टेस्टमधून हे समोर आले. दोन ते तीन मुलींना ताप आल्यामुळे २५ जणांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती अवनिच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी दिली आहे. तसेच १६ ते १८ वयातील मुली पॉझिटिव्ह असल्याने चिंतेचीबाब बनली आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांना शिवाजी विद्यापीठ डीओटी वसतिगृह येथे उपचारासाठी दाखल झाल्या.