शिरोळ / प्रतिनिधी
अयोध्यामधील प्रभू श्रीराम मंदिर पायाभरणी शुभारंभ निमित्त कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने
शिरोळ येथील श्रीराम मंदिरात अमाप उत्साहात व भक्तिमय वातावरणात श्रीराम भक्त विवेक व सौ दिपाली फल्ले या दाम्पत्यांच्या हस्ते श्री प्रभूंच्या मूर्तीवर अभिषेक घालण्यात आला, हा सोहळा बुधवारी सकाळी 10 वाजता राम मंदिरात पार पडला, यावेळी श्रीरामभक्त विठ्ठल भाट उपस्थित होते,
त्यानंतर दुपारी 12 वाजता आयोध्या श्रीराम मंदिर पायाभरणी मुहूर्तावर शिरोळमध्येमध्ये श्रीराम प्रभूच्या मूर्तीचे पूजन करून कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्या हस्ते आरती करण्यात आली ,त्यानंतर शहरात भक्तांना लाडू वाटप करून अयोध्यामधील प्रभू श्रीराम मंदिराच्या पायाभरणी मुहूर्ताचा आनंद श्रीराम भक्तांनी व्यक्त केला, कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित धार्मिक सोहळा कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स व शिस्तबद्ध पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला,
यावेळी शिरोळ येथील श्रीराम मंदिर ट्रस्टचे प्रमुख गोविंदलाल मानधने , मंदिराचे पुजारी दिनेश त्रीपाठी, सागर भाट, मोहन फल्ले यांच्यासह रामभक्त उपस्थित होते,
,,,,,,,,,,,,,,,
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








