प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठी चित्रपट क्षेत्रातील ख्यातनाम अभिनेते निर्माते महेश कोठारे यांनी आज सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची जयसिंगपूर येथील त्यांचे कार्यालयात सदिच्छा भेट घेतली,महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन या संस्थेमार्फत मराठी वाहिनी मधील प्रसिद्ध वाहिनी स्टार प्रवाह साठी निर्माण करीत असलेल्या दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेचे शूटिंग चित्रनगरी कोल्हापूर येथे लवकरच सुरू होत आहे. सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शूटिंगसाठी परवानगी दिल्याबद्दल निर्माते महेश कोठारे यांनी सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेत्री उर्मिला कोठारे, अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारे, निर्मात्या नीलिमा कोठारे, अभिनेते महेश कोठारे उपस्थित होते.
Previous Articleसातारा : कोरोनामुळे मोदक खरेदीला भक्तांचा अल्प प्रतिसाद
Next Article सातारा : महिला तक्रारींचे होणार ऑनलाईन निराकरण









