महिलेला दुसऱ्या मजल्यावरून ढकल्याचा संशय – अपार्टमेंटमध्ये मसाज पार्लर
प्रतिनिधी / कोल्हापूर
राजारामपुरी येथील अपार्टमेंट मधून पडून महिलेचा संशयस्पद मृत्य झाला. दरम्यान या महिलेला अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून ढकल्याचा संशय पोलिसांना आहे. अद्याप मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत महिला अपार्टमेंटच्या तळमजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या फ्लॅट मध्ये मसाज पार्लर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत आधीक माहिती अशी की, राजारामपुरी 11 वी गल्ली बस रूट वर जितकर अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट भाड्याने दिला आहे. मंगळवारी दुपारी याच फ्लॅट मधून एक महिला खाली पडली. रस्त्याकडेला ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली पडली. परिसरातील नागरिकांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेस सिपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
Previous Articleमला आजही वाटतं मी मुख्यमंत्री आहे…
Next Article गुहागर चौपाटीवरील अनधिकृत दुकानांंवर कारवाई









