प्रतिनिधी / कोल्हापूर
बुधवारी दि.4 रात्री पंचगंगा नदीवरील शिवाजी पूलाच्या पश्चिमेस अज्ञात कारची धडक बसून दुचाकीवरील साबीर अल्लाउद्दीन सनदी (वय 25) हा तरुण जखमी झाला होता. राजारामपुरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेण्यासाठी करवीर पोलीसांकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रोष व्यक्त केला आहे.
बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनांने साबीरच्या दुचाकीला धडक देवून जखमी केले होते. पण करवीर पोलीसांनी या अपघाताचा तपास गांभीर्याने केला नाही. असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रविवारी साबीरचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयासमोर गर्दी केली होती. यामुळे तणाव निर्माण झाला होता. अपघातामधील









