फालतुगिरी केल्यास ठोकून काढू
प्रतिनिधी / नाशिक
कोल्हापूर कोल्हापूर अन् साताऱयाची गादी एकच आहे. मात्र काहीजणांकडुन इकडची काडी आणि तिकडची चाडी करुन दोन्ही छत्रपतींमध्ये भांडण लावण्याचा प्रकार सुरु आहे. दोन्ही छत्रपती हे एकच असून त्यांच्यामध्ये कधीही भांडण होणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे असला प्रकार थांबवा, फालतुगिरी केल्यास ठोकून काढू, असा सज्जड इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. तसेच आरक्षणासाठीचा हा शेवटचा लढा असून यामध्ये गटतट चालणार नाहीत.
तरी सर्वांनी एकत्रित येवून आरक्षणाचा लढा देवूया असे आवाहनही त्यांनी केली. नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठक आयोजित केली होती. बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे यांनी रोखठोक भुमिका मांडली. संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षण लढÎासंदर्भात समन्वयक समिती जो काही निर्णय घेईल त्यानुसार आंदोलनाची दिशा ठरेल. मात्र प्रथम आपल्यामधील मतभेद बाजूला ठेवा. आरक्षणाचा हा शेवटचा लढा असल्याने सर्वांनी एकत्र या. कोल्हापूरात मराठा आरक्षणात दोन गट आहेत.
एकीकडे राज्यव्यापी गोलमेज परिषद होते, तर दुसरा गट परिषदेला उपस्थित राहत नाही, हे चालणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम मराठा म्हणून एकत्र या, गटतट बाजूला ठेवून मराठा समाजाच्या पुढील पिढीच्या उद्धारासाठी एकत्रित लढा द्या. मुंबईची मोहीम असो किंवा दिल्लीची मी नेहमीच तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही संभाजीराजे यांनी बैठकीमध्ये दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









