असळज/प्रतिनिधी
खोकूर्ल ता. गगनबावडा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. बाळू भागोजी कांबळे (रा. खोकूर्ल) असे या मृताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, बाळू कांबळे यांना अज्ञात वाहने जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच खोकूर्ल गावचे पोलीस पाटील कैलास इंजर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर याबाबत त्वरीत गगनबावडा पोलीस स्थानकात या अपघाताची माहिती दिली. याबाबत गगनबावडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Previous Articleकर्नाटक : परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा पाचव्या दिवशी संप सुरूच
Next Article खा. उदयनराजेंचे जावलीत ढिश्यूम.. ढिश्यूम..









