प्रतिनिधी / कोल्हापूर
शहराच्या मध्यभागी असणाऱ्या भागातील सार्वजनिक मुताऱ्या पडण्याचे सत्र सुरूच आहे. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल जवळील सिग्नल चौकात शाहू स्टेडियमला लागून असणारी सार्वजनिक मुतारी पाडण्यात आल्याचे सोमवारी उघड झाले. यामुळे सार्वजनिक मुताऱ्या नेमके पडतो कोण ?आणि कशासाठी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर मुताऱ्या पाडण्यात आल्यानंतर महापालिकेची यंत्रणा त्यावर
कोणतीही कारवाई करत नसल्याचाही अनुभव आजवर शहरातील नागरिकांनी घेतला आहे.
गेल्या वर्षी शहरामध्ये विविध ठिकाणच्या सार्वजनिक मुताऱ्या अज्ञातांकडून पाडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महाद्वार रोड येथील बाजार गेट जवळील मुतारी पाडली होती. त्यानंतर आराम कॉर्नर शिवाजी रोड येथील मुतारी एका रात्रीत अज्ञातांनी उध्वस्त केली होती. शाहू खासबाग मैदानाजवळील सार्वजनिक मुतारी एका सामाजिक संघटनेने पाडली होती. खासबाग मैदान ऐतिहासिक असल्याने त्या ठिकाणी सार्वजनिक मुतारी असू नये असा दावा करीत त्या संघटनेने मुतारी पाडून नागरिकांची कुचंबना करण्याच्या पराक्रम केला होता.
सार्वजनिक मुताऱ्या पाडण्यामागे स्थानिक राजकीय हस्तक्षेप असण्याचीही शक्यता व्यक्त होताना दिसते. दरम्यान, सोमवारी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल जवळील सिग्नल चौकातील सार्वजनिक मुतारी पडल्यानंतर स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मुतारी पडणाऱ्यांचा महानगरपालिकेने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी तसेच मुताऱ्या पूर्ववत दुरुस्त कराव्यात, अशी मागणी होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









