व्हनाळी / वार्ताहर
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या संपुर्ण पंचक्रोशीचे लक्ष लागूण राहिलेल्या साके ता.कागाल येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत राजे – मंडलिक आघाडीचा धुव्वा उडाला तर मुश्रीफ – संजयबाबा आघाडीने सर्वच 11 जागेवर निर्विवाद यश संपादन करत विजय मिळवला. अपक्षांच्या पॅनेला देखील भोपळा फोडता आला नाही. 11 जागेंसाठी लागलेल्या निवडणूकीत 36 उमेदवार रिंगणात उतरले होते. विकाच्या मुद्यावर साके येथील मतदारांनी मुश्रीफ-संजयबाबा आघाडीलाच पसंती दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
साके येथे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून सुरू असलेली विकास कामे आणि प्रबळ माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाची मिळालेली समर्थ साथ या आघाडीला एकतर्फी विजयापर्यंत घेवून गेली. या उलट विरोधी समरजितसिंह घाटगे आणि मंडलिक या गटांचा सुरूवातीचा मेळ लागण्याला बराच कालावधी गेला अपक्षांनी घेतलीली मते आणि झालेली बंडखोरी हि मंडलिक- राजे आघाडीला मारक ठरली. त्यामुळेच राजे-मंडलिक आघाडी व अपक्षांतील एकही उमेदवार निवडून येवून शकला नाही.
मुश्रीफ गटाचे गटनेते तालुका संघाचे मा.चेअरमन बाळासाहेब तुरंबे,चंद्रकांत परसू निऊंगरे,मारूती निऊंगरे,अशोक सातुसे,सी.बी.कांबळे, तर संजयबाबा गटाचे माजी.जि.प.सदस्य नानासो कांबळे,ज्ञानदेव पाटील,अशोक पा.पाटील,किरण पाटील,चंद्रकांत काळू निऊंगरे, जुन्या मंडलिक गटाचे डि.एस.निऊंगरे,नागेश गिरी यांनी विजयी भैरवनाथ आघाडीचे नेतृत्व केले. तर विरोधी पॅनेलचे समरजितसिंह घाटगे गटाचे गटनेते शहाजी पाटील,हिंदूराव पाटील,शामराव शेंडे,रावसो चैागले, खासदार प्रा.संजय मंडलिक गटाचे गटनेते हमिदवाडा चे संचालक धनाजी बाचणकर,राजाराम आनंदा पाटील,नामदेव आगलावे यांनी आघाडीचे नेतृत्व केले. तर अपक्ष पॅनलचे प्रकाश निऊंगरे,रमेश कांबळे,अरूण सातुसे,तानाजी के.पाटील,यांनी नेतृत्व केले.
विजयी उमेदवार व मिळालेली मते –
प्रभाग क्र.1- निलेश निऊंगरे (405), प्रभावती जाधव (396),संपदा पाटील(370) प्रभाग क्र.2 – युवराज पाटील (372), अंजली कांबळे (437),अंजना गिरी (425) प्रभाग क्र.3 – सुशिला पोवार(206) ,आक्काताई चैागले(288) प्रभाग क्र.4 – रविंद्र जाधव(398),सुजय घराळ(375),रंजना तुरंबे (450). सैा.रंजना बाळासाहेब तुरंबे यांना उच्चांकी 450 मते मिळाली. यंदा ग्रामपंचायतीवर 11 पैकी 7 महिला सदस्या निवडून आल्या असल्याने महिलाराज अधिक सक्षम झाले आहे.
विकासालाच प्राधान्य….
विकास कामे करून मते मिळत नाहीत या विधानाला साकेच्या मतदारांनी मात्र छेद दिला. गावातील पाणंदेचा 20 वर्षापासुनचा मिटलेला वाद, सत्ता नसताना देखील मुश्रीफ गटाकडून झालेली कोट्यावधींची विकास कामे. संजय घाटगे गटाने अन्नपुर्णा पाणी योजनेच्या माध्यमातून पांढ-या पट्ट्याला केलेली हिरवाई. गेली 25 ते 30 वर्षे पारंपारिक विरोधक असून देखील मुश्रीफ-संजयबाबा गटाचे या निवडणूकीत झालेले मनोमिलन या मुळेच हे एकतर्फी यश आघाडीला मिळाल्याचे स्पष्ट झाले.