अखेर कोरोना प्रतिबंधक लस कोल्हापुरात दाखल
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोव्हॅक्सिन लसच्या उपलब्धतेसाठी आरोग्य विभागाचे एक पथक कोल्ड व्हॅनसह पुण्यात गेले होते. ते पथक बुधवारी लस घेऊन परतले आहे. अखेर कोरोना प्रतिबंधक लस कोल्हापुरात दाखल झाली. या लस कोल्ड व्हॅनव्दारे आण्यण्यात आल्या. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
37 हजार 580 डोस कोल्हापुरात दाखल
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोव्हॅक्सिन लस बुधवारी कोल्हापुरात दाखल झाली. येत्या काही तासात लसीकरण सुरू होणार आहे. त्यानुसारच जिल्हयातील शासकीय कोरोना योध्यांना हे लसीकरण होईल. त्यासाठी पुणे आरोग्य विभागाकडून 37 हजार 580 डोस कोल्हापुरात पाठविल्या आहेत.
25 ठिकाणी होणार वैद्यकीय सेवेकऱयांना लसीकरण
कोल्ड पॅकींग व्हॅनव्दारे या लस कोल्हापुरात आणण्यात आल्या. त्यासाठी आरोग्य विभागाचे एक पथक कोल्ड व्हॅनसह पुण्याला गेले होते. ते बुधवारी लस घेऊन परतले आहे. त्यात सीपीआर रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पिटल, सेवा रुग्णालय, पंचगंगा हॉस्पिटल व पुलाची शिरोली आरोग्य केंद्र आदी 25 ठिकाणी शासकीय सेवेतील कर्मचाऱयांना हे लसीकरण होणार आहे. त्यासाठी शंभरावर कोरोना योध्यांच्या सहभागाने हा ड्राय रन घेण्यात आला. त्यानुसार लस देण्याची प्रक्रिया होणार आहे.”
तीन टप्प्यात होणार लसीकरण
रुग्णालयातील तीन कक्ष आहेत, यात एका कक्षात कोरोना योध्यांचे ओळखपत्र तपासणी होईल. दुसऱया कक्षात लसीकरण होईल. तिसऱया कक्षात संबंधीत योध्याला विश्रांती देण्यात येणार आहे. अशा तीन टप्प्यांमध्ये आरोग्य विभागाचे डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी लसीकरण करतील. या लसीकरण कामकाजाची अंतिम नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
येत्या पंधरा दिवसातच पूर्ण क्षमतेने लसीकरण
या लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात शासकीयस्तरावर काम करणारे कोरोना योध्दे, त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जे-जे घटक कार्यरत आहेत. अशांना लस प्राधान्याने देण्यात येणार आहे. त्यासाठी 25 हजार व्यक्तींची नाव नोंदणी व सर्व्हेक्षण झाले आहे. येत्या पंधरा दिवसातच कोल्हापूर जिल्हयात लसीकरण बहुतांशी ठिकाणी पूर्ण क्षमतेने होईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.