प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हय़ात सोमवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 44 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 449 नवे रूग्ण आढळले तर 2 हजार 87 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 534 झाली आहे. जूनच्या पहिल्या सफ्ताहात प्रथमच सोमवारी कोरोनाने 44 जणांचा बळी घेतला, रविवारच्या तुलनेत सोमवारी दुप्पट मृत्य़ू झाले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये वाढ झाली आहे तर नवे रूग्ण, सक्रीय रूग्णांत झालेली घट महत्वपुर्ण आहे.
जिल्हय़ात सोमवारी कोरोनाने 44 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 954 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 60, नगरपालिका क्षेत्रात 615, शहरात 797 तर अन्य 482 आहेत. मृतांमध्ये जिल्हय़ांतील 39 जण आहेत. दिवसभरात 2 हजार 87 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 6 हजार 333 झाली आहे.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 1 हजार 449 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 47, भुदरगड 34, चंदगड 31, गडहिंग्लज 42, गगनबावडा 8, हातकणंगले 148, कागल 35, करवीर 325, पन्हाळा 114, राधानगरी 24, शाहूवाडी 42, शिरोळ 66, नगरपालिका क्षेत्रात 100, कोल्हापुरात 397 तर अन्य 36 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 23 हजार 821 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून सोमवारी 2 हजार 408 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 836 निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 3 हजार 68 अहवाल आले. त्यातील 2 हजार 680 निगेटिव्हआहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 987 रिपोर्ट आले. त्यातील 1 हजार 437 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 7 हजार 463 स्वॅब रिपोर्ट आले. दरम्यान, कोरोनाने मृत्य़ू झालेल्यांत परजिल्हय़ांतील वैभववाडी, वेगुंर्ला, पुणे, देवगड, सावंतवाडी येथील व्यक्तींचा समावेश आहे.
कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 397 1052 1449
आजपर्यतचे बाधीत 35269 71064 1,23,821
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 2087 1,06,333
दिवसभरातील मृत्यू 7 37 44
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 797 3157 3954
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 511 1836 2408
अँटीजेन 388 2680 3068
ट्रुनेट 550 1437 1987









