प्रतिनिधी / कोल्हापूर
इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याबाबतची माहिती न दिल्यास संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य, लिपीक यांचा पगार स्थगित करण्याचा इशारा माध्यमिक शिक्षण अधिकाऱयांनी दिला होता. त्यांच्या या कृतीचा गुरुवारी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने जिल्हापरिषदेच्या समोर निषेध नोंदवत आदेशाची होळी करण्यात आली.
माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याबाबत माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यानी आप – आपल्या शाळेची माहिती द्यावी असा आदेश नुकताच दिला होता. सदरची माहिती तात्काळ न पाठविल्यास संबंधितांवर कारवाई करुन त्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन स्थगित करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता. येईल व संस्थेला संबंधीतावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मुळातच मुख्याध्यापक, प्राचार्य व संबंधित लिपीकांचे वेतन कपात करण्याचे अधिकार माध्यमिक शिक्षण अधिकाऱयांना नाही आहेत. त्यांनी अशा प्रकारचा इशारा देणे चुकीचे असून त्यांच्या या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच लोहार यांच्या या आदेशाच्या प्रतीची होळी जिल्हापरिषदेसमोर होळी करण्यात आली.
वेतन पथक कार्यालयात पेन्शन धारकांची, तसेच माध्यमिक विभागामध्ये वैद्यकीय बिले, वरिष्ठ वेतन श्रेणी, यासह मुख्याध्यापक नेमणूकांना मान्यता या ठिकाणी संबंधीतांची आर्थिक पिळवणूक सुरु आहे. या ठिकाणी लक्ष घालून याची गांभीर्याने दखल घेवून चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यामागणीचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई ,नायब तहसिलदार अनंत गुरव ,शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना देण्यात आले.
यावेळी व्यासपीठ अध्यक्ष एस.डी. लाड, चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, अध्यक्ष वसंतराव देशमुख, सचिव प्रा. जयंत आसगावकर, शिक्षक नेते दादासाहेब लाड, शिवाजी माळकर, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, पी एस हेरवाडे, प्राचार्य एन आर भोसले, उदय पाटील, आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









