कोरोना मृत्यू, नव्या रूग्णांमध्ये घट
प्रतिनिधी / कोल्हापूर :
जिल्हÎात बुधवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 7 जणांचा मृत्Îू झाला. दिवसभरात 327 नवे रूग्ण आढळले तर 734 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 4 हजार 270 झाली आहे. कोरोना मृत्यू, नव्या रूग्णांसह सक्रीय रूग्णांतही घट झाली आहे. तीन महिन्यांनंतर प्रथमच कोल्हापूर शहरात कोरोना मृत्यू नोंद निरंक राहिली. दिवसभरात परजिल्हÎातील एकही कोरोना मृत्यू नोंद झालेला नाही. गगनबावडा तालुक्यात नव्या रूग्णांची नोंद शुन्य राहिली.
जिल्हÎात बुधवारी कोरोनाने 7 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 582 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 983, नगरपालिका क्षेत्रात 802, शहरात 1 हजार 211 तर अन्य 586 आहेत. दिवसभरात 734 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 89 हजार 520 झाली आहे. गेल्या 24 तासांत 327 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 2, भुदरगड 3, चंदगड 0, गडहिंग्लज 7, गगनबावडा 0, हातकणंगले 64, कागल 7, करवीर 60, पन्हाळा 23, राधानगरी 4, शाहूवाडी 5, शिरोळ 28, नगरपालिका क्षेत्रात 56, कोल्हापुरात 65, तर अन्य 3 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 99 हजार 372 झाली आहे.
परजिल्हा, कोल्हापूर शहरात मृत्यूची नोंद निरंक
तीन महिन्यांनंतर प्रथमच शहरात बुधवारी कोरोना मृत्यू नोंद शुन्य राहिली. परजिल्हÎातील मृत्यूची नोंदही निरंक राहिली. शहरात 62 नवे रूग्ण दिसून आले. दरम्यान, चंदगड, गगनबावडा तालुक्यात नव्या रूग्णांची नोंद निरंक राहिली आहे.
8 मृत्यू, 461 नवे रूग्ण, 654 कोरोनामुक्त,
कोल्हापूर शहर, परजिल्हÎातील मृत्यू निरंक,
गगनबावडा, चंदगडमध्ये नवे रूग्ण नोंद निरंक
कोरोना रूग्ण ः 327 एकूण ः 1,99,372
कोरोनामुक्त ः 734 एकूण ः 1,89,520
कोरोना मृत्यू ः 7 एकूण मृत्यू ः 5582
सक्रीय रूग्ण ः 4270









