प्रतिनिधी / कोल्हापूर
गोठे (ता. पन्हाळा ) येथील एकाच कुटुंबातील पती, पत्नी व लहान मुलगा यांनी एकमेकांना दोरीने घट्ट बांधून घेत कुंभी नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गोठे परिसरात घडली. या घटनेमुळे गोठे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिपक शंकर पाटील (वय ४२), वैशाली दिपक पाटील (वय ३६) व मुलगा विघनेश (वय -१२) अशी मृत पावलेल्यांची नावे असून त्यांची मुलगी आजोळी गेल्यामुळे यातून बचावली आहे. तर दिपकचे वडील वृद्ध आहेत. दिपक हे शेतकरी होते. त्यांच्या या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. या घटनेचा पुढील तपास कळे पोलीस करत आहेत.