प्रतिनिधी / कोल्हापूर
पुर्ववैमनस्यातून टिंबर मार्केट येथील गंजीमाळ परिसरातील घरावर सोमवारी रात्री 40 ते 50 जणांच्या जमावाने सशस्त्र हल्ला केला. काठय़ा, तलवार, हॉकी स्टीक, सह हल्लेखोरांनी घरात घुसून महिलांसह, वृद्ध, तरुणांवर जिवघेणा हल्ला केला. या मध्ये 10 जण जखमी झाले असून दुचाकी, मोटारींसह घरातील टिव्ही, तिजोरीसह प्रापंचीक साहित्याची नासधूस केली. जखमींवर सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या घटनेमुळे टिंबर मार्केट परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मोटारी पलटी, दुचाकींची मोडतोड
30 ते 40 जणांच्या जमावाने जाधव यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी दारात लावलेल्या दोन मोटारी हल्लेखोरांनी पलटी केल्या. यामध्ये असणारा भाजीपाल्याचीही नासधूस केली. परिसरात लावण्यात आलेल्या दुचाकींवरही हल्ला चढविला. सुमारे 10 ते 15 दुचाकींचे हल्लेखोरांनी नुकसान केले. मोटारीच्या काचा फोडून आतील, सिटची नासधूस करण्यात आली तर मोटारीचे डिझेल टँक फोडून ते पेटवून देण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला. तर या रस्त्यावरील रिक्षाही पलटी करुन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्नही केला.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा > कोल्हापुरात कुटुंबावर जमावाचा सशस्त्र हल्ला
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









