प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात सोमवारी कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला, अन् दिवसभरात कोरोनाने 34 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्हय़ातील 26 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 431 नवे रूग्ण दिसून आले. सक्रीय रूग्णसंख्या 4 हजार 34 झाली. दिवसभरात 243 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, सलग तीन दिवस कोरोना बळींनी दुहेरी आकडा गाठला, पण सोमवारी कोरोना मृत्यूच्या संख्येत एकाच दिवसांत तिफ्पट वाढ झाल्याने कोरोनाने कोल्हापुरकरांची धास्ती वाढवली आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेतील हे आजपर्यंतचे उच्चांकी बळी आहेत. दरम्यान, सीपीआर पूर्ण कोरोना आयसोलेटेड झाले आहे तर कंटेनमेंट झोनही घोषीत झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
जिल्हय़ात सोमवारी गेल्या 24 तासांत 34 जणांचा मृत्यू झाला. या 34 बळींमुळे आजपर्यत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 917 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 926, नगरपालिका क्षेत्रात 366, शहरात 430 तर अन्य 195 जण आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत 2 हजार 572 जणांची तपासणी केली. त्यातील 689 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे. जिल्ह्य़ातील सक्रीय रूग्णसंख्या 4 हजार 34 वर पोहोचली आहे. दिवसभरात 243 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 51 हजार 800 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
गेल्या 24 तासांत 431 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 7, भुदरगड 2, चंदगड 5, गडहिंग्लज 12, गगनबावडा 0, हातकणंगले 30, कागल 4, करवीर 41, पन्हाळा 17, राधानगरी 4, शाहूवाडी 11, शिरोळ 41, नगरपालिका क्षेत्रात 37 कोल्हापुरात 179 तर अन्य 41 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 57 हजार 751 झाली आहे. शहरात 663 तर ग्रामीण भागात 1 हजार 338 जणांना होम कोरोंटाईन केले आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून 662 अहवाल आले. त्यापैकी 419 निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 50 अहवाल आले. त्यातील 21 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 317 रिपोर्ट आले. त्यातील 103 निगेटिव्ह आहेत.
‘सीपीआर’मध्ये फक्त कोरोना रूग्णांवर उपचार, वॉर रूम सुरू
सीपीआर हॉस्पिटल सोमवारी पूर्णपणे कोरोना आयसोलेटेड झाले. रूग्ण, बेडच्या माहितीसाठी वॉर रूम उभारली आहे. सीपीआरमधील सर्व वार्डमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. रूग्णांसाठी 450 बेड उपलब्ध झाले आहेत. त्यातील 425 बेड ऑक्सिजन अॅटिच आहेत. सीपीआरमध्ये 2 हजार किलोचा ऑक्सिजन टँक असून तो पुरेसा आहे. येथे माहिती कक्ष सुरू केला आहे.
जिल्हय़ात हेल्थ आणि केअर सेंटर सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सोमवारी यासंदर्भातील गाईडलाईन्स आरोग्य विभागाला मिळाल्या. त्यानुसार परवान्याची प्रक्रिया लगेचच सुरू झाली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे तातडीने काही केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत.
जिल्हय़ात हजार जणांना लस
जिल्हय़ात 105 केंद्रांवर सोमवारी 9 हजार जणांना प्रतिबंधक लस देण्यात आली. आजपर्यत लाख हजार नी लस घेतली असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली.
दिवसभरातील 34 कोरोना मृत्यू
सीपीआर हॉस्पिटल : 9 बळी
दुगलवाडी ता. गडहिंग्लज 52 वर्षीय पुरूष
रेठरे ता. शाहूवाडी 69 वर्षीय पुरूष,
मुडशिंगी, ता. करवीर : 52 वर्षीय पुरूष
म्हासरंग, ता. भुदरगड 70 वर्षीय पुरूष
कणेरीवाडी, ता. करवीर 44 वर्षीय पुरूष
हुपरी, ता. हातकणंगले 50 वर्षीय महिला
न्यू शाहूपुरी, कोल्हापूर 57 वर्षीय महिला
शास्त्रीनगर कोल्हापूर 79 वर्षीय पुरूष
रूकडी, ता. हातकणंगले 61 वर्षीय महिला
आयजीएम हॉस्पिटल, इचलकरंजी : 9 बळी
टाकवडे वेस इचलकरंजी 38 वर्षीय पुरूष
म्हेतर गल्ली इचलकरंजी 67 वर्षीय पुरूष
बंडगर मळा इचलकरंजी 71 वर्षीय पुरूष,
कासारपुतळे, ता. राधानगरी 62 वर्षीय महिला
नरंदे, ता. हातकणंगले 70 वर्षीय महिला
दानोळी, ता. शिरोळ 60 वर्षीय महिला
शहापूर, इचलकरंजी 53 वर्षीय पुरूष
दत्तनगर, शहापूर इचलकरंजी 63 वर्षीय पुरूष
दत्तनगर इचलकरंजी 49 वर्षीय पुरूष
खासगी हॉस्पिटल : 16 बळी
अयोध्या पार्क इचलकरंजी 55 वर्षीय महिला
पाली, जिल्हा रायगड 59 वर्षीय महिला
मिरज, जि. सांगली 55 वर्षीय पुरूष
अशोकनगर पुणे, 26 वर्षीय महिला,
नांदगाव, कणकवली सिंधुदुर्ग 79 वर्षीय पुरूष
घोडेगाव पुणे 42 वर्षीय पुरूष
चरण, ता. शाहूवाडी 70 वर्षीय पुरूष
खोतवाडी, ता. हातकणंगले 83 वर्षीय पुरूष
शाहूपुरी कोल्हापूर 77 वर्षीय पुरूष
मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर 83 वर्षीय पुरूष
फुलेवाडी कोल्हापूर 35 वर्षीय महिला
राजारामपुरी कोल्हापूर 53 वर्षीय पुरूष
गावभाग शहापूर हातकणंगले 82 वर्षीय महिला
सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग 73 वर्षीय पुरूष
गारवे, ता. फलटण, जि. सातारा 62 वर्षीय पुरूष
हस्तीनापूरनगरी, सुर्वेनगर कोल्हापूर 40 वर्षीय पुरूष
सीपीआर हॉस्पिटलमध्ये शहरातील चौक येथील वर्षीय आणि वर्षीय चा मृत्यू झाला. तालुक्यातील येथील वर्षीय पुरूष, येथील वर्षीय ,
जिल्हय़ातील येथील वर्षीय , येथील वर्षीय चा मृत्यू झाला.
इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये तालुक्यातील येथील वर्षीय , येथील वर्षीय, आणि येथील वर्षीय गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात तालुक्यातील येथील वर्षीय पुरूष, येथील वर्षीय मृत्यू झाला. शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये येथील वर्षीय येथील वर्षीय, येथील वर्षीय चा मृत्यू झाला.