प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात बुधवारी कोरोनाने 32 जणांचा मृत्यू झाला, तर 969 नवे रूग्ण दिसून आले. दिवसभरात 562 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 8 हजार 250 झाली आहे. जिल्हय़ात कोरोनाने 27 जणांचा मृत्यू झाला. कोरोना रूग्णसंख्येत वाढ झाली आहे.
जिल्हय़ात बुधवारी कोरोनाने 32 जणांचा मृत्यू झाला. कोरोना बळींची संख्या 2 हजार 178 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 54, नगरपालिका क्षेत्रात 394 , शहरात 476 तर अन्य 254 जण आहेत. दिवसभरात 2 हजार 570 जणांची तपासणी केली. सक्रीय रूग्णसंख्या 8 हजार 250 झाली आहे. दिवसभरात 562 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 55 हजार 175 झाली आहे, अशी माहिती शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
गेल्या 24 तासांत 969 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 39, भुदरगड 53, चंदगड 19, गडहिंग्लज 19, गगनबावडा 2, हातकणंगले 64, कागल 54, करवीर 118, पन्हाळा 17, राधानगरी 11, शाहूवाडी 9, शिरोळ 95, नगरपालिका क्षेत्रात 73 कोल्हापुरात 312 तर अन्य 84 जणांचा समावेश आहे. कोरोनाची एकूण रूग्णसंख्या 65 हजार 603 झाली आहे.
शहरात 919 तर ग्रामीण भागात 3 हजार 761 जणांना होम कोरोंटाईन केले आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून बुधवारी 2 हजार 169 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 652 निगेटिव्ह आहेत. अँन्टीजेन टेस्टचे 1 हजार 175 अहवाल आले. त्यातील 1 हजार 57 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार रिपोर्ट आले. त्यातील 676 निगेटिव्ह आहेत. जिल्हय़ात कोरोनाने जणांचा 32 मृत्यू झाला. त्यात जिल्हय़ातील 27 तर परजिल्हय़ातील 5 जणांचा समावेश आहे.
लस नाही, तरीही रांगेत राहिलेल्यांची निराशा
जिल्हय़ात बुधवारी सायंकाळपर्यत लस आलेली नाही. मंगळवारी कोविशिल्ड लस संपली, बुधवारी कोव्हŸक्सिन लसीचा दुसरा डोस लाभार्थ्यांना देण्यात आला. पण पहाटेपासून शहरातील नागरी आरोग्य केंद्रांवर लसीसाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी 10 च्या सुमारास लस येणार नसल्याचे समजताच पहाटेपासून केंद्र परिसरात थांबून राहिलेल्यांची निराशा झाली. दरम्यान, गुरूवारीही लसीकरण होण्याची शक्यता कमी असल्याचे आरोग्य विभागातून स्पष्ट करण्यात आले.
Previous Articleसांगलीचे वनाधिकारी प्रमोद धानके यांची ठाणे येथे बदली
Next Article महागाईचे मळभ









