प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी इचलकरंजी येथे 64 वर्षीय महिलेचा तर शहरात कदमवाडी येथील हॉस्पिटलमध्ये जाधववाडी येथील 45 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला. 24 तासांत 277 नवे रूग्ण दिसून आले यामध्ये शहरातील 137 रूग्ण आहेत. 80 जण केरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 1 हजार 735 वर पोहोचली आहे.
इचलकरंजी येथील महिलेचा आयजीएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला तर कदमवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये शहरातील पुरूषाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 802 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 870, नगरपालिका क्षेत्रात 354, कोल्हापूर शहरात 407 तर अन्य 171 जण आहेत. 80 कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 50 हजार 180 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 277 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 2, भुदरगड 6, चंदगड 4, गडहिंग्लज 0, गगनबावडा 1, हातकणंगले 14, कागल 0, करवीर 17, पन्हाळा 6, राधानगरी 2, शाहूवाडी 3, शिरोळ 16, नगरपालिका क्षेत्रात 51 कोल्हापुरात 137 तर अन्य 18 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 53 हजार 717 झाली आहे. दिवसभरात 2 हजार 357 जणांची तपासणी केली. त्यातील 286 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. शहरात 314 तर ग्रामीण भागात 667 जणांना होम कोरोंटाईन केले आहे.
शेंडा पार्क येथून शुक्रवारी आलेल्या 2 हजार 315 अहवालापैकी 2 हजार 48 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 206 अहवाल आले. त्यातील 165 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 488 रिपोर्ट आले. त्यातील 390 निगेटिव्ह आहेत. सध्या 1 हजार 735 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









