प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात सोमवारी कोरोनाने आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील दोघे करवीरमधील 1 अन् हातकणंगले तालुक्यातील चौघांचा समावेश आहे. कोरोना बळींची संख्या 208 झाली आहे. सायंकाळपर्यत 489 नवे कोरोना रूग्ण दिसून आले. एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 7 हजार 394 झाली आहे. खासगी लॅबचे 151 रिपोर्ट पॉझिटिव्ह असून त्यामध्ये शहरातील 64 आहेत.
जिल्हय़ात सोमवारी आर. के. नगर येथील 58 वर्षीय पुरूष, सुभाषनगर येथील 72 वर्षीय वृद्ध, करवीर तालुक्यातील उचगाव येथील 60 वर्षीय महिला तर हातकणंगले तालुक्यात वाठार येथील 70 वर्षीय वृद्ध, हुपरी येथील 78 वर्षीय वृद्ध, इचलकरंजी येथील 46 वर्षीय पुरूष आणि पट्टणकोडोली येथील 53 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. या 7 कोरोना मृत्यूमुळे बळींची संख्या 207 झाली आहे.
जिल्हय़ात सोमवारी सायंकाळपर्यत 2 हजार 99 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 972 जणांचे स्वॅब घेतले आहेत. सद्यस्थितीत 3 हजार 639 जा उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत 1 हजार 625 स्वॅबचे रिपोर्ट आले. त्यातील 1 हजार 228 निगेटिव्ह आहेत. 63 रिपोर्ट पेंडींग आहेत. तर 447 पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील 178 आहेत. आजरा 4, भुदरगड 1, चंदगड 4, गडहिंग्लज 2, गगनबावडा 3, हातकणंगले 56, कागल 8, करवीर 45, पन्हाळा 23, राधानगरी 13, शाहूवाडी 9, शिरोळ 19, नगरपालिका क्षेत्रात 78 आणि अन्य 4 नव्या रूग्णांचा समावेश आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 7 हजार 394 झाली आहे. दिवसभरात 203 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यतच्या कोरोनामुक्तांची संख्या 3 हजार 270 झाली आहे.
Previous Articleदक्षिण गुजरातमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
Next Article चाकरमान्यांसाठी नियोजन होणार कधी ?








