प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने दोन महिलांसह चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1772 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 82 नवे रूग्ण मिळून आले. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या 51 हजार 979 झाली आहे. सक्रीय रूग्णसंख्या 772 आहे. 77 जण केरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 435 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाने मंगळवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये शिवाजी पेठेतील 71 वर्षीय पुरूष आणि करवीर तालुक्यातील आंबेवाडी येथील 50 वषींय महिलेचा मृत्यू झाला. तर राजारामपुरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये कागल तालुक्यातील माद्याळ येथील 62 वर्षीय पुरूष आणि हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील 68 वर्षीय महिलेचा लक्ष्मीपुरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या 4 बळींमुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 772 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 862, नगरपालिका क्षेत्रात 351, कोल्हापूर शहरात 393 तर अन्य 166 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 77 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 435 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 91 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 4, कागल 1, करवीर 10, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 1, शिरोळ 2, नगरपालिका क्षेत्रात 5, कोल्हापूर शहरात 44 तर अन्य 14 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात 1299 जणांची तपासणी केली. त्यातील 151 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. कोरोना रूग्णसंख्या 772 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून आलेल्या 806 अहवालापैकी 757 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 97 अहवाल आले. त्यातील 93 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 291 रिपोर्ट आले. त्यातील 243 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 51 हजार 979 आहेत. त्यापैकी 49 हजार 435 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 772 रुग्ण उपचार घेत आहेत. शहर आणि परिसरात 350 तर ग्रामीण भागात 131 जणांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिली.
कोरोना रूग्ण 82 : एकूण : 51979
कोरोनामुक्त 77 : एकूण : 49435
कोरोना मृत्यू : 4 : एकूण मृत्यू : 1772
सक्रीय रूग्ण : 772









