प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. तसेच जिल्ह्यात कोरोना बळींच्या आकड्यातही वाढ होत आहे. काल, शनिवारी 24 तासात 28 जणांचा बळी गेल्यानंतर आज पुन्हा 24 जणांचा मृत्यू झाला. तर जिल्ह्यात 545 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
कोल्हापूर शहरात 208 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील 202 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.
कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचा अहवाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आता त्यांच्या पत्नी नगरसेविका जयश्री जाधव आणि मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Previous Articleसोलापूर : वैराग मधील कोविड सेंटर कोरोनाला आमंत्रित करतय ?
Next Article कोल्हापूर : चिकोत्रा धरण पुर्ण क्षमतेने भरले









