प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोनाने मृत्यूचे तांडव सुरूच आहे. आज जिल्ह्यात कोरोनाने 41 जणांचा बळी घेतला. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. 24 तासांत तब्बल 1 हजार 122 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली आहे.
कोरोनामुळे राज्यासह जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. तरीही जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आणि मृतांचे आकडे चिंता वाढवणारे आहेत.
Previous Articleगुरूवारी कोरोना रुग्ण संख्येने पार केला 800 चा आकडा
Next Article मुलाच्या निधनाचे वृत्त समजताच आईचाही मृत्यू









