प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात बुधवारी कोरोनाने 53 जणांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हय़ातील 46 जण आहेत. आजपर्यतने कोरोनाने घेतलेले हे उच्चांकी बळी आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या दुसऱया लाटेतील 1 हजार 553 इतके सर्वाधिक रूग्ण आढळून आले. तसेच 1 हजार 18 जण
कोरोनामुक्त झाले,10 हजारांवर गेलेली सक्रीय रूग्णसंख्या वाढलेले बळी व रूग्णसंख्येने सामुहिक संसर्ग सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हय़ात कोरोनाच्या लाटेने बुधवारी कहरच केला. अवघ्या 24 तासांत 53 जणांचा बळी घेतला. कोरोना बळींची संख्या 2 हजार 460 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 204, नगर पालिका क्षेत्रात 425, शहरात 538 तर अन्य 293 जण आहेत. दिवसभरात 3 हजार 83 जणांची तपासणी केली. सक्रीय रूग्णसंख्या 10 हजार 274 झाली आहे. दिवसभरात 1 हजार 18 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 60 हजार 647 झाली आहे. शहरात 1 हजार 720 तर ग्रामीण भागात 4 हजार 347 जण होम कोरोंटाईन आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी सांगितले.
गेल्या 24 तासांत 1 हजार 553 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 16, भुदरगड 61, चंदगड 24, गडहिंग्लज 18, गगनबावडा 1, हातकणंगले 94, कागल 64, करवीर 161, पन्हाळा 76, राधानगरी 20, शाहूवाडी 23, शिरोळ 308, नगर पालिका क्षेत्रात 187 कोल्हापुरात 360 तर अन्य 140 जणांचा समावेश आहे. कोरोनाची एकूण रूग्णसंख्या 73 हजार 381 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून बुधवारी 2 हजार 922 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 966 निगेटिव्ह आहेत. अँन्टीजेन टेस्टचे 1 हजार 743 अहवाल आले. त्यातील 1 हजार 397 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 843 रिपोर्ट आले. त्यातील 521 निगेटिव्ह आहेत. जिल्हय़ात कोरोनाने 53 जणांचा मृत्यू झाला. केरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेतील कोरोनाने घेतलेले हे उच्चांकी बळी आहेत. कोरोनाचा सामुहिक संसर्ग सुरू झाल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
Previous Articleमराठा आरक्षणासाठी घटना दुरूस्ती हा एकमेव पर्याय : शाहू महाराज
Next Article आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेवरही टांगती तलवार कायम









