प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात आज पुन्हा ९ कोरोना बाधितांची भर पडलीय. आज दुपारी साडेचारपर्यंत जिल्ह्यात ९ रुग्ण वाढले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २३७ झाली आहे.
दरम्यान, कोल्हापुरात मुंबई-पुण्यासह रेड झोनमधून येणाऱ्यांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण शाहूवाडी तालुक्यात सापडले आहेत. तर शहरातही रुग्ण वाढत असल्याने भितीचे वातावरण आहे.








