प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात महिनाभरानंतर कोरोनाने गुरूवारी दोघांचा बळी घेतला. शहरातील कणेरकरनगर येथील वृद्ध सराफाचा सीपीआरच्या कोरोना वॉर्डमध्ये दुपारी मृत्यू झाला. शहरातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला. दरम्यान, चंदगड तालुक्यातील अडकूर येथील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. चंदगड तालुक्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला. जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या 10 झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 3 पॉझिटिव्ह आल्याने जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 768 वर पोहोचली आहे. शहरात कणेरकरनगर, न्यू कणेरकरनगर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे.








