प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात काल, रविवारी दिवसभरात १४ रुग्णांची वाढ झाली असतानाच आज, सोमवारी सकाळी आणखीन पाच रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवेंदिवस वाढच होत असल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. तर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आज आढळून आलेल्या पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सीपीआरमधील एक, राधानगरी तालुक्यातील 2, आजरा तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 56 वर पोहोचली आहे.








