अन्य दुकाने राहणार बंदच, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यशासनाने लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील जिल्ह्याचे पाच स्तर निश्चित केले आहेत. पॉझिटीव्ह रेट आणि ऑक्सिजन बेडस व्यापालेली टक्केवारीनुसार याचे नियोजन केले आहे. यामध्ये कोल्हापूर चौथ्या स्तरात येत असून येथे फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. उर्वरित सर्व दुकाने बंदच राहणार असून याची अंमलबजावणी आज, सोमवारपासून होत आहे.
कोल्हापूरचा गेल्या सात दिवसांमध्ये सरासरी पॉझिटिव्हीटी रेट हा 17.96 असून ऑक्सिजन बेडस व्यापालेची टक्केवारी 77.81 इतकी आहे. यानुसार कोल्हापूर चौथ्या स्तरामध्ये समावेश होतो. मैदाने, खेळ, चित्रकरण, संस्थेच्या सर्वसाधारण सभांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये सवलती आणि नियमांचे आज सोमवारपासून अंमलबजावणी होत असून ती पुढीलप्रमाणे आहे.
हे राहणार सुरू
| सेवा | अटी |
| अत्यावश्यक सेवेतील दुकाने | सर्व दिवशी दुपारी 4 पर्यंत |
| रेस्टॉरंट | फक्त घरपोहोच सेव |
| मैदाने, फिरणे, सायकलींग, खेळ | सोमवार ते शुक्रवार सकाळी 5 ते 9 सुरू, “शनिवार व रविवारी बंद |
| शासकीय कार्यालय | 25 टक्के उपस्थितीला परवानगी |
| चित्रीकरण परवानगी नाही | गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन सायंकाळी पाच पर्यंत चित्रीकरणास परवानगी शनिवारी, रविवारी |
| लग्नसमारंभ | 25 लोकांनाचा परवानगी |
| अंत्ययात्रा | 20 लोकांनाच परवानगी |
| राजकीय बैठक, संस्थांच्या सभा | सभागृहाच्या 50 टक्के क्षमतेपर्यंत मर्यादीत |
| बसेस | 50 टक्के क्षमता, उभे राहून प्रवासाला बंदी |
| मालवाहतूक | सुरू |
| रेल्वे अंतर जिल्हा प्रवास | ई पास बंधनकारक |
| व्यायामशाळा, सलून दुकान, ब्यूटी पार्लर | 50 टक्के क्षमता, दुपारी 4 पर्यंत परवानगी. |
| हे सर्व राहणार बंद जीवनावश्यक वगळून इतर सर्व दुकाने मॉल्स, सिनेमा हॉल धार्मिक, राजकीय, करमणुकीचे कार्यक्रम, मेळावे लोकल रेल्वे |









