कोलार/प्रतिनिधी
कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील ७ महिन्याच्या गर्भवती महिला पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मंगळवारी या गर्भवती महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला.
दरम्यान दक्षिण कन्नड पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय शमीली यांनाकोरोनाची लग्न झाल्यानंतर त्यांच्यावर कोलार येथील आरएम जलप्पा रुग्णालयात उपचार उपचार सुरु होते. परंतु आज मंगळवारी त्यांचा उपचारादरम्यानमृत्यू झाला.
शमीली दक्षिण कन्नड जिल्ह्यात काम करत होत्या. “त्या सात महिन्यांच्या गरोदरहो त्या. गर्भवती असल्याने त्यांना कोरोना लस दिली गेली नव्हती,” असे ते म्हणाले.
तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी ट्वीट केले की, “कोविडमुळे बळी पडलेली पोलीस कुटुंबातील सर्वात तरुण सदस्य आहे. डीके जिल्ह्याशी संलग्न असलेल्या पीएसआय शमीली, कोविडबरोबरची लढाई हरली. तिच्या आत्म्याला शांती लाभो. “









