बसमधील आठ प्रवाशी जखमी,
प्रतिनिधी / म्हापसा
कोलवाळ बिनानी जवळ कॅन्टर व बसमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत कॅन्टर चालक जागीच ठार झाला. हा अपघात काल मंगळवारी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास घडला. विनोद मुरार यादव (32, रा. उत्तर प्रदेश) असे मयत चालकाचे नाव आहे. हा अपघात कॅन्टर चालकाने मद्य प्राशन केल्याने झाल्याची माहिती बसमधील प्रवाशांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅन्टर चालक विनोद यादव हा आपल्या ताब्यातील कॅन्टर घेऊन पेडणेच्या दिशेने जात होता तर पत्रादेवी म्हापसा अशी वाहतूक करणारी बस पेडणेहून येत होती. यावेळी कोलवाळ बिनानी जवळ देन्ही वाहने पोहचताच कॅन्टर चुकीच्या बाजूने येऊन बसला धडकला. या झालेल्या अपघातात कॅन्टर चालक जागीच ठार झाला. तर बसमधील आठ प्रवाशी किरकोळ जखमी झाले.
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये भावना धीरज च्यारी (वय 38, रा. थिवी), सरिता सज्जन मयेकर (वय 23, रा. सातोशे), स्वाती मडसो हिंदे (वय, 27, रा. सांखळी), पुनम अनंत मेस्त्राr (वय 28, रा. करासवाडा), ममता भीवा गडेकर (वय 36, रा. रेल्वेस्थानकाजवळ), मयुरी मोहन चिंदरकर (वय 31, रा. करासवाडा म्हापसा) यांचा समावेश आहे. हवालदार सतीश नाईक यांनी घटनेचा पंचनामा केला.









