प्रतिनिधी/ म्हापसा
बुधवारी कोलवाळ सेंटर जेलमध्ये जेलगार्ड कोविड 19 चा रुग्ण आढळून आल्याने येथे एकच धावपळ उडाली. वास्को येथील हा गार्ड रहिवासी असून दोन दिवसापूर्वीच ते कामावर रुजू झाले होते. येथील तुरुंग अधिकारी भानुदास पेडणेकर यांनी वास्को येथील कामावर असलेल्यांना त्वरित कामावर रुजू व्हा असा आदेश दिल्याने ते कामावर रुजू झाले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
जेलमध्ये आढळलेला रुग्ण वास्को येथील रहिवासी आहे. त्यांची बहीण व आई यापूर्वी पोझिटिव्ह मिळाली आहे अशाने तो कालवाळ तुरुंगात वरिष्ठांच्या आदेशानुसार रुजू झाला होता. दोन दिवस आजारी असल्याने तो रजेवर गेला असता त्याने कोविड टेस्ट चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्याने फोनवरून ही माहिती आपल्या अधिकारी वर्गांना दिली असता येथे एकच धावपळ उडाली. यामुळे म्हापसा अग्निशमनच्या जवानांनी बंबच्या ठिकाणी नेऊन संपूर्ण जेल सेनिटायझ केली असल्याची माहिती देण्यात आली.









