ओटवणे / प्रतिनिधी:
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या पुढाकारातून कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातील आंबेगाव, कुणकेरी आणि कोलगाव येथील मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले. गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या सीएसआर निधीतून या सायकलींचे वितरण करण्यात आले.
मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र यांच्या संकल्पनेतून आणि गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत जन शिक्षण संस्थानच्या माध्यमातून जिल्ह्यात एक हजार मुलींना सायकल वितरण करण्यात येत आहे. याच योजनेतून कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातील मुलींना सायकल वितरण करण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग, कोलगाव सोसायटी चेअरमन साबाजी धुरी, ग्रामविकास अधिकारी कांता जाधव, ग्रामपंचायत सदस्य रोहित नाईक, संदीप हळदणकर, आत्माराम चव्हाण, रसिका करमळकर, प्रणाली टीळवे, हेमांगी मेस्त्री, माजी सरपंच मधुकर नाईक, शिक्षक अरविंद मेस्त्री, श्री मुननकर, शिक्षक, पालक, माधुरी नाईक, शक्ती केंद्र प्रमुख योगेश गवळी आदी उपस्थित होते.
Previous Articleसावंतवाडी तालुक्यातील ८० दशावतारी कलाकारांना धान्याचे वितरण
Next Article संभाजीराजेंच्या दिल्लीतील सरकारी बंगल्यात शिरलं पाणी









