सावंतवाडी पोलिस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागांकडून शोध सुरू
सावंतवाडी / प्रतिनिधी:-
सावंतवाडी-कोलगांव येथील आयटीआय काॅरंटाईन जेलमधून संशयित आरोपी प्रमोद मधुकर परब याने सोमवारी पहाटे पावणेसहाच्या दरम्याने खिडकीचे ग्रील उचकटून पलायन केले. तत्पूर्वी त्याने खाली उतरण्यासाठी बडेशीटचा वापर केला. सदर संशयिताचा सावंतवाडी पोलिस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग शोध घेत आहे. हा कैदी अत्याचार प्रकरणी अटकेत होता. ड्युटीवर चार पोलीस तैनात असताना या कैद्याने पलायन केल्याने खळबळ माजली आहे. या खोलीत एकूण ४ कैदी होते. त्यातील ३ कैदी झोपले असताना हा प्रकार घडला.