पाइस हॉटेल्सचा पर्याय
कोलकाता शहरात अद्याप अनेक पाइस हॉटेल्स आहेत, जेथे जेवण अत्यंत स्वस्त मिळते. केवळ 3 रुपयांमध्ये तुमचे तेथे पोट भरु शकते. पाइस हे हॉटेलचे नव्हे तर स्वस्त असल्याने त्यांना पाइस हॉटेल म्हटले जाते. यातील काही हॉटेल्स 100 वर्षांपेक्षा जुनी आहेत.
या हॉटेल्सना भातेर हॉटेल किंवा राइस हॉटेल देखील म्हटले जाते. काही लोक त्यांना हिंदू हॉटेल देखील म्हणतात. यातील काही हॉटेल्समध्ये जेवण 3 रुपयांमध्sय मिळते. तर काहींमध्ये याहून अधिक किंमतीत, तरीही ते देशातील अन्य शहरांच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आणि उत्तम असते.

परंतु या सर्व हॉटेल्समध्ये वेगवेगळय़ा प्रकारचे आणि स्वादिष्ट भोजन मिळते. ज्यांचे दर वेगवेगळे आहेत. पण अनेक पाइस हॉटेल्समध्ये पोटभर जेवण तुम्ही 3 रुपयांपासून 25 रुपयांमध्ये प्राप्त करू शकता. येथे दुपारच्या तसेच रात्रीच्या जेवणावेळी मोठी गर्दी असते. काही अद्याप जुन्या पद्धतीने कार्यरत आहेत, जेथे जमिनीवर केळीच्या पानात जेवण वाढले जाते.
शाकाहारी थाळी स्वस्त तर मांसाहारी थाळी काहीशी महाग असते. यातील सर्व पदार्थ हे पारंपरिक बंगाली संस्कृतीशी निगडित असतात. यात मोहरीच्या तेलाचा भरपूर वापर होतो. कोलकाता शहर कधीच उपाशी ठेवत नसल्याचे बोलले जाते.
ब्रिटिश काळात प्रारंभ
पैशामुळे या हॉटेल्सना पाइस हे नाव पडले आहे. हे पाइस हॉटेल इंग्रजांच्या काळात तेथे सुरू झाले होते. ब्रिटिश काळात पैशाला पाइस म्हटले जात होते. ही खाण्याची ठिकाणे साधारण वाटली तरीही काही पैशांमध्ये लोकांना स्वादिष्ट आणि स्वच्छ भोजन देणारी आहेत. कोलकात्यात हजारो लोकांचे जेवण येथेच होते. या हॉटेल्सच्या मेन्यूत फारसा बदल झालेला नाही. येथे मच्छा भाजा (फ्राइड फिश), माछर झोल (फिश करी), कुमरो फूल भाजा (फ्लॉवरची भाजी), आलु पोस्तो (बटाटय़ाची भाजी) तसेत भात वाढला जातो. येथे जेवण वाढण्याची पद्धत काहीशी वेगळी आहे.
केळीच्या पानावर जेवण

पाइस हॉटेलमधील जेवण केळीचे पान आणि द्रोणांमध्ये वाढले जाते. ग्राहकांना जमिनीवर बसून जेवावे लागते. या हॉटेल्सपैकी काही अनेक पिढय़ांकडून चालविली जात आहेत. या पाइस हॉटेल्समध्ये तरुण निकेतन, सिद्धेश्वरी आश्रम, स्वादिन भारत, जगन्नाथ आश्रम, प्रभाती हॉटेल, पार्वती हॉटेल येथील प्रसिद्ध आणि जुन्या हॉटेल्सपैकी एक आहेत. काही हॉटेल्स महिला चालवितात. तेथे एका दिवसात किमान 300-400 लोक जेवत असतात.









