रेस्टॉरंटकडून वितरण : खाताना काढण्याची गरज नाही
अनलॉकनंतर हळूहळू रेस्टॉरंट आणि फूड कॅफेमध्ये लोकांची गर्दी वाढू लागली आहे. संबंधित रेस्टॉरंटचे मालक संक्रमण रोखण्यासाठी नवनवे मार्ग अवलंबित आहेत. कोलकाता शहरात एक रेस्टॉरंट ग्राहकांना झिप लावलेला मास्क देत आहे. समाजमाध्यमांवर याची छायाचित्रे प्रसारित होत आहेत. खातानाही हा मास्क हटवावा लागत नाही हेच त्याचे वैशिष्टय़ आहे. खाताना केवळ ग्राहकांना झिप ओपन करावी लागते. खाऊन झाल्यावर झिप पुन्हा बंद करता येणार आहे. हा मास्क रेस्टॉरंटमध्ये येणाऱया ग्राहकाला मोफत दिला जात आहे.
संक्रमणापासून सुरक्षेचा पुढाकार
कुठल्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ग्राहकांना हा झिप मास्क उपलब्ध करत आहोत. याचा वापर अनिवार्य नाही. संबंधित ग्राहकाला याचा वापर करायचा नसल्यास तो नकार देऊ शकतो. संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी हा मास्क तयार करण्यात आल्याची माहिती रेस्टॉरंटच्या मालकाने दिली आहे.









