कोलकाता / वृत्तसंस्था
कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्राथमिक आकडेवारीनुसार 75 टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्या काळात अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे. भाजपच्या कार्यालयाबाहेर हातबाँबचा स्फोट करण्यात आला असून त्यात 3 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना अटक केल्याचेही सांगण्यात येत आहे. या निवडणुकीत तृणमूल काँगेसची लढत भाजपशी आहे. काही भागांमध्ये डावी आघाडीही लढत देईल अशी शक्यता आहे. मतदारांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी तृणमूल काँगेस हिंसाचाराचा आधार घेत असल्याचा आरोप भाजपने केला असून चौकशीची मागणी होत आहे.









