ऑनलाईन टीम / बोगोटा :
कोलंबियात कोरोनाबाधितांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोलंबियात आतापर्यंत 10 लाख 25 हजार 052 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 9 लाख 24 हजार 044 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोलंबियात सोमवारी 9 हजार 167 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 194 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोलंबियात 70 हजार 660 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2365 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 30 हजार 348 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत कोलंबियाचा जगात आठवा क्रमांक लागतो. कोलंबियात आतापर्यंत 47 लाख 89 हजार 625 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या, भारत दुसऱ्या तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे.









