बोगोटा
कोलंबियाच्या समुद्र किनारी शहरांमध्ये आफ्रिकन, क्युबा व हैतीतील स्थलांतरीत घुसखोरांनी प्रवेश केला असल्याने ही बाब कोलंबियाला डोकेदुखीची झाली आहे. यामार्गे सदरचे स्थलांतरीत अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब समोर आली आहे. तसे करताना कोलंबियातील किनारी शहरात राहत असल्याने स्थानिकांचा त्यांना विरोध होताना दिसतो आहे.
आफ्रिकेतील बरेचसे नागरिक कोलंबियाच्या किनारी शहरामध्ये प्रवेश करत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. नेकोक्ली या सीमेवरच्या किनारी शहरांमध्ये वरील स्थलांतरीतांची संख्या वाढल्याने पेच निर्माण झाला आहे. स्थानिक अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार 10 हजाराहून अधिक जण अलीकडेच नेकोक्ली शहरामध्ये दाखल झाले आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येने स्थलांतरीत येथे आल्याने स्थानिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. यासंदर्भात कोलंबियन सरकारने संबंधीत देशाच्या अधिकाऱयांशी चर्चा केली असल्याचे समजते. लवकरच संयुक्त कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









