वृत्तसंस्था/ माँटेरी (मेक्सिको)
येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील माँटेरी खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कोलंबियाच्या नवोदित कॅमिला ओसोरिओने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना युक्रेनच्या स्वीटोलिनाचा पराभव केला.
शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ओसोरिओने युक्रेनच्या स्विटोलिनाचा 1-6, 7-5, 7-6 (7-5) असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना अडीच तास चालला होता. या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या अन्य एका सामन्यात सहाव्या मानांकित स्पेनच्या डायझने आपल्याच देशाच्या सारा टोर्मोचा 6-3, 1-6, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.









