मुंबई
गुरुगप्पा समूहाची फर्म असणारी कोरोमंडल इंटरनॅशनल विशाखापट्टणम येथील जवळपास 400 कोटी रुपयांचा सल्फ्यूरिक ऍसिडचा नवा प्रकल्प उभारण्याची योजना बनवत असल्याची माहिती मंगळवारी कंपनीने दिली आहे. यामध्ये नवीन प्रकल्पात प्रतिदिन 1,650 टन इतक्या क्षमतेचे उत्पादन घेणार असल्याचेही नमूद केले आहे.
कंपनीने एमईसीएस (मोनसेंटो एनविरो केम सिस्टम्स) आणि टीकेआयएस (थिसेनप्रुप इंडस्ट्रीयल सोल्येन्स) सोबत करार करत त्यावर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.
सल्फ्यूरिक ऍसिडमध्ये भारत तिसरा
भारत हा जगात सल्फ्यूरिक ऍसिडचा जगातील तिसरा सर्वात मोठा आयात करणारा आहे. देशात उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत लाभ उठवला जाणार असल्याचे कोरोमंडल इंटरनॅशनलचे कार्यकारी उपाध्यक्ष अरुण अलगप्पन यांनी सांगितले आहे.









